Sunday, March 25, 2018

कल्पवृक्ष वड Banyan Tree


वैज्ञानिक वर्गीकरण
राज्य:वनस्पती
विभागणी:मॅग्नोलीफायटा
वर्ग:मॅग्नोलिओपेडा
ऑर्डर:Urticales
कुटुंब:मोरेसी
लिंग:फिकस
उपजतनः(उरोस्टिग्मा)

वडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र
 नाव: वड  / बरगद 
शास्त्रीय नाव: फिकस बेन्गालनिस
दत्तक: 1 9 50
मध्ये सापडले: भारतीय उपखंडातील मूळ
पर्यावरणीय: स्थलीय
संवर्धन स्थिती: धोक्यात नाही
प्रकार: अंजीर
आकारमान: 10-25 मीटर उंची; 100 मीटर पर्यंत शाखा विस्तार
इतर नावे: बरगद, बोर, बेर, आला आणि पेड्ढा मारि, नयवरात्र, आला मारा, बार, वड, वतनम, बहुपथ, पेददरीरी, अल या नावाचा बर्याच वृक्ष म्हणून वापर केला जातो. भारतीयांना एक इच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणतो. 
.वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.वड हा मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे.
वडाचे झाडे हे बहुधा रस्त्याच्या कडेला लावले जाते. पण मोकळ्या जागेत हे अधिक चांगले वाढते
.स्थान: भारतातील जवळजवळ सर्व भागांमध्ये आढळतात, वृक्षाचे झाड भारताचे राष्ट्रीय झाड आहे. हे उप-हिमालयाच्या क्षेत्रामध्ये आणि पर्णपालन जंगलांमध्ये घेतले जाते. कलकत्ताच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये बायन्य वृक्ष होऊ शकते. ते मोठ्या प्रमाणात रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात घेतले जातात आणि भारतात कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

वर्णन : वटवृक्षाची उंची सुमारे तीस मीटर पर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी आहे. वटवृक्षात दुधी रंगाचा चीक असतो. त्यात काऊट चाऊल व रेसिन असते. वृक्षाचे खोड जाड व घट्ट असते. फांद्या जाड व जमिनीत समांतर वाढतात. फांद्यांवर ठराविक अंतरावर पारंब्या फुटतात, त्या जमिनीत गेल्यानंतर फांद्यांना आधार देतात. त्यामुळे वटवृक्षाची वाढ प्रचंड प्रमाणात होऊ शकते. झाडाची पाने जाड असून ती कातडीप्रमाणे चिवट, १०−२० सें.मी. लांब व ५ ते ७.५ सें.मी. रूंद असतात. त्‍यांचा आकार अंडाकृती व दीर्घवर्तुळाकृती असतो. पानांचा पृष्ठभाग केशविरहीत, चकचकीत व गर्द हिरवा आणि खालचा पृष्ठभाग सूक्ष्म लवयुक्त, ठळक शिरा असणारा व फिकट हिरवा असतो. फुलोरे गोलाकार, काहीसे पोकळ, पानांच्या दुबेळक्यात येणारे, लवयुक्त, कोवळ्या व अपक्वावस्थेत हिरवे व टणक, पक्कावस्थेत लालबुंद व नरम अशा लक्षणांनी युक्त असतात. या फुलोऱ्यांनी कुंभालनी पुष्पबंध म्हणतात. फुलोऱ्यांचे संयुक्त फळ बनते. त्याला औदुंबरिक फळ असे म्हणतात. मार्च ते जूनच्या काळात ही फळे झाडावर विपुल प्रमाणात दिसतात. अनेक पक्षी, वटवाघळे, खारी व माकडे इ. प्राणी ती खातात. फळे त्‍यात असणाऱ्या कीटकांमुळे माणसांना खाण्यास योग्य नसतात.

खोड, पाने,फुले,फळे :

वडाची पाने व फळे
वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. पाने मोठी रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिकट असतात. हिरवट रंगाची, फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात. पण तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये, फांदीवर, खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. लालचुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडीजोडीने लागलेली ही फळे बघून बहिणाबाईंना वडाच्या झाडाला पोपटाचे पीक आल्यासारखे वाटले होते. फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो

कृष्णवड : या नावाने परिचित असलेला वृक्ष खऱ्या वडांपेक्षा निराळा आहे. त्याचे शास्त्रीय नाव फा. कृष्णी असे आहे. इंग्रजीत त्याला कृष्णाज बटरकप असे संबोधितात. याची पाने पात्याच्या तळाजवळ दुमडलेली असून पेल्यासारखी (द्रोणासारखी) दिसतात. या पानांच्या पेल्यात श्रीकृष्ण लोणी ठेवून खात असे, अशी दंतकथा आहे. हा वृक्ष लहानसर असून शोभेसाठी बागेत लावतात.
भारतीय समाजजीवनात त्याला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे. भारतात कुठेही गेलात तरी देवळाजवळ, गावात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला वटवृक्ष जपण्याची परंपरा दिसून येईल. तो देखील कुटुंबप्रमुखासारखा अटळ, अचल उभा राहून संसाराला जीवन, संरक्षण व सुविधा देण्याचे कर्तव्य बजावत असतो. गावातील कित्येक पिढ्या, लहानथोर त्याच्या अंगावर खेळून मोठी होतात. गावोगावी वडाच्या पारावर बसून आयुष्याची संध्याकाळ घालवणारे हजारो लोक आहेत; एरवीही पारावरच्या गप्पा प्रसिद्धच आहेत. टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ऐकल्या, की त्या गप्पाच आठवतात ना! कितीतरी ज्येष्ठांना त्यांची सुखदु:खे वाटण्यासाठी त्याच्या विशाल सावलीचा आधार असतो.
लागवडीचे पध्दती:  बर्याच वृक्ष सहजपणे मूळ टीप कपाळ्याद्वारे किंवा डोळ्याच्या कपाळ्याद्वारे प्रचारित केले जातात. खाली आणि लीफच्या वरच्या अर्ध्या एक इंच स्टेमवर कट करा. रिमपॅथीमध्ये स्टेम तुकडा आणि थोडेसे पानांची डोल घालून द्या. पानांची पृष्ठभाग वरून बाष्पीभवन कमी करण्यासाठी, आपण पानांचे रोल करा आणि रबर बँडसह सुरक्षित करू शकता. एक दोन आठवड्यांत मुळे आणि एक नवीन शूट विकास सुरू होईल. हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकते.
सांस्कृतिक/धार्मिक महत्त्व :
वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात.
चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आडळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी शतपथ ब्राह्मणात याच्या उत्पत्तीची कथा आहे. वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवांचे ‘वड’ हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात

आर्थिक महत्व :

वटवृक्षाच्‍या मुळाचे लाकूड लवचिक व अधिक बळकट असते. तंबूंचे खांब,  बैलगाड्यांचे जू व दांडे इत्यादींच्‍या निर्मितीसाठी ते उपयोगी आहे. खोडाचे लाकूड करडे व साधारण कठीण असते. त्याचा उपयोग अनेक किरकोळ वस्तू तयार करण्यासाठी व सर्वसाधारण सजावटी सामानासाठी होतो. वडाच्या लाकडापासून कागदाचा लगदा तयार करता येतो. सालीच्या धाग्यांपासून दोर तयार करतात. पारंब्यांचाही दोरी म्हणून वापर करता येतो. चिकापासून अतिशय चिकट गोंद बनवतात. त्याचा उपयोग पाखरे पकडण्यासाठी केला जातो. पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करतात. कोबळ्या फांद्या व पानांचा शेळ्या, मेंढ्या व इतर गुरांना चारा म्हणून उपयोग होतो. हा चारा हत्तींना मोठ्या प्रमाणात लागतो. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात. वडाच्या सालीत ११% टॅनीन असते. तिचा रस स्तंभक (आकुंचन करणारा) व पौष्टिक असतो. आमांश व अतिसारात तो उपयोगी आहे. वृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.वडाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळी करतात. वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वाचा औषध म्हणून उपयोग होतो. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढतात, लांब होतात, मऊ व काळे होतात व त्यांना चमक येते.

पर्यावरणीय महत्व : एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे. त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो जास्तीत जास्त कर्बवायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. वड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकतो. त्याचा उपयोग ढग बनण्यासाठी आणि हवेत आर्द्रता व गारवा निर्माण करण्यासाठी देखील होतो. पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेऊन पाऊस पाडण्यास मदत करणे हेदेखील वडाच्या झाडाचे कार्य आहे. वटवृक्ष सदैव हिरवागार असतो व त्याच्या विशाल आकारामुळे तो भरपूर सावली देतो.
वडाचे आयुर्वैदिक उपयोग :-
रस - तुरट, 
गुण -शीत, 
वीर्य -शीतल, 
दोषघ्नता - कफ-पित्तशामक
*वडाची पाने*
*१* लघवीला व्यवस्थित होत नसली, लघवी होताना जळजळ होत असली, लघवी पूर्ण झाली आहे असे वाटत नसले, तर वडाच्या पिकलेल्या पानांचा काढा करून घेण्याचा उपयोग होतो. वडाची चार - पाच पिकलेली पाने एक लिटर पाण्यात घालून एक अष्टमांश काढा करता येतो. 
*२* ताप आला असता घाम आणण्यासाठी वडाची पाने उपयोगी असतात. साळीच्या लाह्यांचे पीठ पाण्यात मिसळावे, त्यातच स्वच्छ धुतलेली वडाची दोन - तीन पाने टाकावीत व एक अष्टमांश काढा करावा. हा काढा घेण्याने घाम येतो व ताप कमी होतो. विशेषतः पित्तामुळे आलेला ताप या उपायाने चांगल्या प्रकारे कमी होतो. 
*३* वडाची पाने सूज वा ठणका आलेल्या जागेवर गरम करून तेल किंवा तूप लावून बांधल्यास सूज उतरते व ठणका थांबतो. 
*४* तोंडात फोड येणे, तोंड येणे, चट्टे पडणे यावर वडाच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात. 
*५* इसब व मुळव्याधीवर वडाची पिकलेली पाने जाळून त्याची राख खोबरेल तेलात खलून लावावी. 
*६* गर्भधारणा होण्यासाठी वडास नवी पालवी फुटताना जे अंकुर येतात ते वाटून बोराएवढ्या गोळ्या कराव्यात व रोज तीनवेळा एक गोळी घ्यावी. 
*७* लचक, संधीवात यावर वडाची पाने तेल लावून दुखर्‍या भागावर बांधावीत.
*८* गळु पिकण्यासाठी वडाची पाने गरम करुन बांधतात. 
*वटांकुर* 
*९* वडाला पालवी फुटते, त्यावेळी फांदीच्या टोकाला कळीप्रमाण दिसणारे अंकुर येतात. हे वटांकुर खूप औषधी असतात. वड थंड असतो. त्यामुळे वटांकुर अतिशय पित्तशामक असतात, *१०* पित्तामुळे नागीण उठल्यास खूप दाह होतो, त्यावर वटांकुर बारीक वाटून लेप करण्याचा उपयोग होतो. 
*११* वडाचे अंकुर शुक्रवर्धक असतात. तसेच गर्भाशयाची ताकदही वाढवितात. म्हणूनच वटांकुर गर्भधारणेस मदत करतात. *ताजे वटांकुर वाटून त्याच्या बोराएवढ्या आकाराच्या तीन गोळ्या रोज तूप-साखरेसह घेण्याने व वरून दूध पिण्याने गर्भधारणा होण्यास मदत मिळते.*
*१२* गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ व्यवस्थित व्हावी, बाळ दीर्घायुषी व्हावे यासाठी पहिल्या महिन्यात वटांकुर आठपट दुधात वाटून सेवन करण्यास सांगितले आहे. 
*वडाचे साल*
*१३* वडाच्या सालीचा काढा घेण्याने स्त्रियांच्या अंगावरून पाणी किंवा पांढरा स्राव जात असल्यास कमी होतो. पाळीच्या दिवसात किंवा पाळीव्यतिरिक्‍त अति रक्‍तस्राव होत असल्यास तो कमी करण्याचा उपयोग होतो.
*१४* गोवर-कांजिण्या आल्यावर दाह होत असल्यास थंड पाण्यात वडाची साल वाटून लेप करण्याने बरे वाटते.
*१५* जखम भरत नसल्यास त्यावर वडाची साल ठेचून बांधण्याचा आणि बरोबरीने वडाच्या सालीचा काढा घेण्याचा उपयोग होतो. 
*१६* मेदोवृद्धीवर मुळांच्या सालीचा काढा द्यावा. 
*१७* तोंड येते त्यावरही वड-उंबराच्या सालीच्या व काढ्याच्या गुळण्या करण्याने किंवा सात - आठ मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवण्याने बरे वाटते. 
*१८* वड, पिंपळ, उंबर, पाईर आणि निंब यांच्या सालीचा ‘पंचवल्कल’ काढा जखमा भरून यायला उत्तम असतो. वडाच्या चिकानं पायाला पडलेल्या भेगा, कात्रे भरून येतात.
*१९* वडाच्या सालीत ११% टॅनीन असते. तिचा रस स्तंभक (आकुंचन करणारा) व पौष्टिक असतो. आमांश व अतिसारात तो उपयोगी आहे. 
*२०* वटवृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे.
*२१* मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे.
*२२* वडाच्या काडीने दात घासल्यास दात मजबूत तर होतातच, पण हिरड्याही घट्ट होतात.
*२३* वडाच्या सालीचे चुर्ण खोब-याच्या तेलातून जुनाट जखमेवर लावल्यास फायदा होतो.
*२४* त्वचेचा रंग उजळण्यासाठी वडाच्या सालीचे चूर्ण दुधा सोबत लावल्यास फायदा होतो.
*२५* स्त्रीयांना होणारा आजार श्वेत प्रदर (पाढरे पाणी) यावर वडाची साल तांदुळाचे धुवणा सोवत घ्यावी तसेच याच्या काढ्याने योनीची स्वच्छता करावी.
*२६* वडाच्या मुळीचा काढा मेदोवृद्धी वर म्हणजे स्थुलतेवर उपयुक्त आहे. वीर्य दोष, धातुपतन, इंद्रियशिथीलता इ. विकारात देखील उत्तम फायदा होतो.
*वडाच्या पारंब्या*
*२७* तापात अंगाची आग होत असताना वडाच्या पारंब्यांचा काढा घेण्याचा उपयोग होतो.
*२८* प्रमेहावर वडाच्या पारंब्यांचा काढा घेण्याचा उपयोग होतो. वडाच्या पारंब्यांसह इतर केश्‍य द्रव्यांनी संस्कारित केलेले तेल केसांसाठी चांगले असते. यामुळे केस लांब, दाट व गडद रंगाचे होण्यास मदत मिळते.
*२९* जुलाब होत असल्यास वडाच्या परंब्या तांदळाच्या धुवणासह वाटून ताकासह देण्याचा उपयोग होतो.
*३०* पित्तामुळे उलट्या होत असताना वडाच्या पारंब्या भिजत घातलेले पाणी पिण्याचा उपयोग होतो. या पाण्यामुळे तहानही शमते, पित्तामुळे येणारी चक्कर कमी होते.
*३१* वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढतात, लांब होतात, मऊ व काळे होतात. त्यांना चमक येते.
*३२* पारंब्यांचा काढा रक्तवर्धक, शक्तिवर्धक असतो. फळेही बुद्धिवर्धक आहेत.
*३३* सारखी लघवी होणे, प्रमेह (फक्त मधुमेह नव्हे) यावर वडाच्या पारंब्यांचा उपयोग होतो.
*३४* वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. केस वाढीसाठी, केस काळे होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या तेलाच्या नित्य वापराने केस मृदु, मुलायम, सुंदर होतात .
*३५* पोटात जंत झाले असता वडाच्या पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून हा रस पिण्यास देतात.
*३६* ताप आल्यास अंगाची आग होते, त्यावर पारंब्यांचा रस अंगास लावावा.
*३७* अतिसार झाल्यावर वडाच्या पारंब्या तांदळाच्या धुुवणात वाटून गाळून, ताक मिसळून देतात.
*३८* वड केशवर्धक आहे. वडाच्या कोवळ्या पारंब्यांपासून सिद्ध केलेले तेल किंवा पारंब्यांचा रस केसांना लावल्यास केस वाढतात.
*३९* स्तन शैथिल्यात वडाच्या पारंब्यांचा लेप करतात. रक्तविकारात वडाचा काढा देतात.
*४०* अतिसारावर पारंब्या तांदुळाच्या धुवणात वाटून ताक घालून देतात.
*४१* लघवी अधिक प्रमाणात तसेच अधिक वेळा होत असल्यास वडाच्या पारंब्यांचा काढा मधा सोबत घेतल्यास फायदा होतो.
*४२* वडाच्या पारंब्यांपासून तयार केलेले वटजटादि तेल केस लांब, दाट वकाळे होण्यास मदत करते.
*४३* . तापात सर्व अंगाची लाही लाही होत असते अशा वेळी पारंब्याच्या रसाने सर्व अंगाला मालिश केल्यास थंडावा मिळतो.
*४४* कृमी-जंत या विकारात वडाच्या पारंब्याचा रस सेवन केल्यास बरे वाटते.
*४५* स्तन शैथिल्यावर वडाच्या पारंब्यांना वाटून स्तनावर लेप केल्यास शैथिल्य दूर होते.
*४६* केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कोवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो.
*४७* दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते.
*वडाचा चीक*
*४८* ताकद वाढविण्यासाठी, धातुवृद्धिसाठी वडाचा चीक खूप उपयोगी असते. चमचाभर खडीसाखरेचे चूर्ण भिजेल एवढ्या प्रमाणात वडाचा चीक मिसळून तयार झालेले मिश्रण आठ दिवस घेण्याने गुण येतो.
*४९* जळवातामुळे हाता-पायाला भेगा पडतात त्यावर वडाचा चीक लावण्याचा फायदा होतो. यामुळे वेदना पटकन कमी होतात.
*५०* जखमेवर वडाचा चिक लावतात.
*५१* विंचू चावल्यास वरून वडाचा चीक लावण्याची पद्धत आहे.
*५२* झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात.
*५३* मैथुन शक्ती वाढविण्यासाठी वडाचा चिक बत्ताश्यात घालून खावावा.
*५४* जीवाणूंच्या प्रादुर्भावाने होणार्‍या त्वचारोगांवर वडाच्या झाडाचा पांढरा चिक औषधी म्हणून वापरला जातो.
*वडाची फळे*
*५५* प्रमेहामध्ये वडाची फळे खाण्याचा उपयोग होतो.
*५६* याच्या फळांचा उपयोग ‘मधुमेह’ आजारात औषधरूपानं होतो.
*५७* वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.
*५८* वडाची पिकलेली फळे खाल्ल्यास लघवीतील साखरही कमी होते.
*५९* वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.
*६०* वड ग्राही म्हणजे मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतो, जखम शुद्ध करण्यास व भरून आणण्यास मदत करतो, त्वचेसाठी हितकर असतो, विसर्प म्हणजे नागिणीवर उपयोगी असतो, दाह कमी करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भाशयाचे रोग दूर करण्यास सक्षम असतो.
*६१* यकृताच्या आजारामध्ये आणि पोटातील जळजळ, उलटी अशा अनेक व्याधींवर आयुर्वेदात वडाच्या झाडाचे महत्त्व दिसते. युनानी औषधी शास्त्रामधेही वड हे मूळव्याधसारख्या आजारांवर गुणकारी म्हणून वापरले जाते.
*६२* आयुर्वेदात वडाचे झाड हे आतड्यांचे विकार व पित्तावर गुणकारी औषध म्हणून महत्त्वाचे आहे.
वडाचे कितीतरी औषधी उपयोग आहेत.
वटवृक्षाचे आयुर्वेदात फार महत्त्वाचे स्थान आहे. अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून या झाडाच्या सर्व अवयवांचा उपयोग होतो. प्राचीन काळी ऋषी मुनी केस घट्ट चिकटून राहून शुद्ध राहण्यासाठी जटांना वडाचा चीक लावीत असत.
आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. भारतीय वैद्यकशास्त्राने सृष्टीचक्र अखंड गतिशील राहण्यासाठी झाडाचे काय महत्त्व आहे ते ओळखले होते. वटवृक्ष हे पशू निवार्‍याचे स्थान आहे कारण याची दाट सावली, भरपूर पर्णसंभार आणि गारवा. वटवृक्षातून बाहेर सोडल्या जाणार्‍या कार्बन वायूबरोबरच बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने तो इतर वृक्षांपेक्षा अधिक गारवा देतो.

No comments:

Post a Comment

कल्पवृक्ष वड Banyan Tree

वैज्ञानिक वर्गीकरण राज्य: वनस्पती विभागणी: मॅग्नोलीफायटा वर्ग: मॅग्नोलिओपेडा ऑर्डर: Urticales कुटुंब: मोरेसी लिंग: फिकस उपजतनः (उरो...